पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०८.२०२२
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने काळेवाडी विजयनगर येथे स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर घेऊन साजरा करण्यात आला. शिबिराचे आयोजन शहर युवक उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले. पिंपरी-चिंचवड काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सज्जी वर्की, पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले व सफाई कामगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, करणसिंग गिल, सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख,पर्यावरण विभाग अध्यक्ष अक्षय शहरकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, जिफिन जॉन्सन, अथर्व माने, रोहित भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी युनिव्हर्सल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे व्यवस्थापक डॉ.रणविजय सिंग व इतर तज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कसबे यांनी केले प्रास्ताविक चंद्रशेखर जाधव यांनी तर आभार जमीर शेख यांनी मानले.