रायगड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अमित साहू
दि.०६.०३.२०२३
उरण- होळीचे औचित्य साधून ५ मार्च रोजी प्रायोजक विराट एम. एस. फुंडे व आयोजक श्रीराम क्रिकेट क्लब फुंडे टीम तर्फे फुंडे गावाजवळ भव्य असे क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. यात विजेत्या टीमला रोख रक्कम वीस हजार आणि ५ फूट उंचीचा भव्य चषक ठेवण्यात आला होता. क्रिकेटच्या सामन्यांचे वेगळे पण म्हणजे आगरी संस्कृतीचा वसा जपत सर्व टीम व अतिथी वर्गाच्या स्वागत सन्मानाबरोबरच येथे सर्वांना सुकट आणि भाकरीच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.
या सामान्यांचे प्रायोजक आणि विराट एम.एस. फुंडे क्रिकेट असेसोरिसचे मालक श्री मयूर मुकुंद म्हात्रे त्यांचा संघ श्रीराम क्रिकेट क्लब फुंडे व इतर सहयोगी यांनी हा आगळा वेगळा उपक्रम राबवून आपल्या आगरी संस्कृतीचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.