बारामती(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०३.२०२०
बारामती- भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज केरळ राज्यात ५ नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. या बरोबर भारतातील करोना रग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरीक करत आहेत तिच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दाखवली आहे.
अजित पवार यांनी आज बारामतीत झालेल्या विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी अजित पवार यांनी एकही व्यक्तीला हात न मिळवता, प्रत्येक ठिकाणी हात जोडून नमस्कार केला. यावर बोलताना कोरोनामुळे आपण हस्तांदोलन टाळत असून तुम्हीही अशीच काळजी घ्या, असा सल्ला अजित पवारांनी उपस्थितांना दिला.
अजित पवार म्हणाले की, लोकांना वाटेल मी उपमुख्यमंत्री झालो आहे. म्हणून आता हात मिळवत नाही. मात्र तसं काही नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळे मी हातात हात देणं टाळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच कोरोना आजाराबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी असं आवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केले.



















