मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.२५.०९.२०२२
नवी मुंबई – तुर्भे येथील अन्नपूर्णा चौकात २० सप्टेंबरला संध्याकाळी ८ वाजता, एका रिक्षाचालकास ह्रदय विकारचा झटका आल्याचे वाहतूक नियमन करण्याऱ्या पोलिसांच्या लक्षात येताच, वेळेचे गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी वाहतूक नियमन करणारे पो.ह सतीश गिरासे आणि त्यांचे सहकारी युवराज पाटील ह्यांनी तातडीने त्या रिक्षा चालकास (अरुण पाटील) रिक्षाने सानपाडा येथील सूरज हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. आणि रिक्षा चालक अरुण पाटील यांचा जीव वाचवला.
वाहतूक पोलिसांचे मनापासून कौतुक करून ह्या धाडसी आणि कार्यतत्परता कामगिरी बद्द्ल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या विचारांना अनुसरून नवी मुंबई शहर अध्यक्ष मयुर कारंडे व त्यांच्या सहकाऱ्यांसह दोन्ही पोलिसांचा शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नवी मुंबई सचिव प्रदीप कणसे, मैत्री फाउंडेशन अध्यक्ष अक्षय काळे, आणि समाजसेवक प्रणय शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



















