बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल पवार
दि.२७.०६.१९
बीड- अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनेची सकारात्मक बैठक झाली. शेतकरी संघटनेने सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे पीककर्ज, पीकविमा या संदर्भात तक्रार केली होती. आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यामुळे या बैठकीचे आयोजन केले गेले. जिल्हाधिकारी यांनी ईतर कामे आहेत हे सांगत अप्पर जिल्हाधिकारी यांना बैठक घेण्यास सांगितले असुन याबैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्नावर पंधरादिवसात सर्व खात्यांचा अहवाल मागवला व कार्यवाहीचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील शेतकरी सध्या विविध अडचणीतून जात असल्या कारणाने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न पुढीलप्रमाणे नाफेड मार्फत सन २०१७-१८ च्या तुर,हरभरा व २०१८-१९ च्या मुग खरेदीची रक्कम तात्काळ देणे,खरीप पिक कर्ज व शैक्षणिक कर्ज वितरीत करणे,थकीत कर्जाचे पुर्नगठण करावे, शेतकऱ्यांच्या बचत खात्याचे होल्ड उठवणे,जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखा दलाल मुक्तकरणे,सातबारा वरील एक लाख साठहजार रुपयापर्यंतचा बोजा कमी करणे,पिक विमा खरीप २०१८ सोयाबीन व इतर पिकांची विमा रक्कम देणे,पिक विम्यातील त्रुटी दुर करुन विमा वितरीत करावा,पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या कामाला गती देणे व त्यांच्या याद्या प्रसिध्द करणे, महसुल संहिता १९६६ मधील कलम ८५ शेतजमीन वाटणीपत्राची अंमलबजावणी तात्काळ करणे,कोहली ते सोलापूर इंडियन आँइल पाईप लाइनसाठीच्या अधिग्रहीत जमिनीचा मावेजा देऊनच आष्टी तालुक्यातील काम सुरु करण्यात यावे,सौर पंपांच्या जास्तीची घेतलेली अमानत रक्कम प्रति पंप नऊ हजार रुपयेप्रमाणे व्याजासहित परत देण्यात यावी ही रक्कम जिल्ह्याभरात सुमारे एक कोटी पंन्नास लाख रुपये इतकी आहे,दोन शेतकऱ्यांना एक रोहीत्र तात्काळ देण्यात यावे,एफ. आर.पी. न देणाऱ्या साखर कारखान्याची आर. आर. सी. करुन शेतकऱ्यांचे थकलेली रक्कम तात्काळ देण्यात यावी,दुहेरी व्याजवसुली बाबत लेखा परीक्षण करण्यात यावे,पिक कर्ज माफीच्या रक्कमेवर घेतलेले व्याज बँकांनी शेतकऱ्यांना परत करावे,तलाठी,ग्रामसेवक,कृषीसाहय्यक, पशूवैधकिय अधिकारी,आरोग्य सेवक,सेविका,वायरमन मुख्यालयी हजर राहत नाहीत. अश्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले असता त्यावर अहवाल मागवला असुन लवकरच कारवाही करु असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी दिले.या बैठकीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन,रामेश्वर गाडे,अशोक हाटवटे,शाबानखान पठाण,भिमा झगडे,रामप्रसाद गाडे अशोक हातवटे, रघुनाथ नावडे,रहेमान सय्यद,मच्छींद्र जगताप,बोराडे व इतर शेतकरी उपस्थित होते.



















