उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, वसीम सय्यद
दि.१०.१२.१९
उस्मानाबाद- जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या कळंब शहर व तालुक्यात अवैध धंदे फोफावल्याचे चित्र निर्माण झाले आहे! मटका जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे पोलीस प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कळंब मधे खुलेआम मटका सुरू असून या अवैध उद्योगाकडे पोलिस यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे कळंब सह परिसरात मटका जोरात सुरू आहे शहराच्या ठिकाणांसह ग्रामीण भागातील मटका एजंट की संख्या वाढताना दिसत आहे कळंब शहरात छत्रपती शिवाजी चौक, आंबेडकर चौक, बस स्टँड समोर खुलेआम मटका सुरू आहे. मटक्यावर महाराष्ट्र राज्यात सर्वत्र प्रतिबंध असताना मात्र कळंब शहर व तालुक्यात मटका व्यवसाय जोमाने फुलत असल्याचे दिसत आहे. अनेक बुक्की चालक हे स्थानिक पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करून अवैधधंदे चालवत असल्याच्या अनेक तक्रारी लोक करत आहेत. शहरात मोठया प्रमाणावर उघडपणे अवैद्य धंदे चालू असून, यामुळे हजारो नागरिकांचे संसार धुळीला मिळाले आहेत. आठ दिवसाच्या आत शहरातील अवैद्य धंदे त्वरित बंद न झाल्यास शिवसेना स्टाईलने अंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, यांना शिष्टमंडळा ने भेटून दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने मोक्याच्या ठिकाणी उघडपणे अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. मटक्यामुळे हजारो जणांच्या संसाराची राखरांगोळी झाली असून याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागातून येणारे शेतकरी , व्यापारी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मटका, ऑनलाईन लॉटरी, पत्ते खेळत असल्याने व हीच मंडळी खेळणाऱ्यांना व्याजाने पैसे ही देत असल्याने, महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरात शिवाजी चौक, इंदिरा नगर, सावरगाव(पू) ,होळकर चौक, आंबेडकर चौक, जुने बसस्थानक, नवीन बसस्थानका जवळ ,बाजार मैदान येथे अड्डे आहेत, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. हे धंदे तात्काळ बंद न झाल्यास शिवसेना स्टाईल ने अंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी दिला आहे. या निवेदनावर उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, शहर प्रमुख प्रदीप मेटे, सुरेश शिंदे, गजानन चोंदे, शंकर खंडागळे, अनिल पवार, सुनील गायकवाड, सुरेश इंगळे, विजय पारवे, सागर बाराते, मुश्ताक भाई कुरेशी, दिनकर काळे, उदयचंद्र खंडागळे, सुनील लाला पवार, भारत शिंदे, सतीश टोणगे, संजय चोरघडे, महादेव चोरघडे, संजय घुले, प्रदीप यादव , सचिन काळे, अजित गुरव, गोविंद चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



















