पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.१२.२०२१
दौंड- बहुजन महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करुन चालणार नाही तर महापुरुषांनी केलेल्या समाजहितासाठी केलेल्या कामाची आणि त्यांच्या विचारानुसार कामकाज केले पाहिजे.त्यासाठी गावागावातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे असे मत चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष सिताराम वेताळ यांनी व्यक्त केले. थोर समाजसुधारक, प्रबोधनकार, संतशिरोमणी रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी दौंड तालुक्यातील सहजपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना वेताळ म्हणाले की, राज्य शासनाने सर्व महापुरुषांची नावे जतन ठेवण्यासाठी जयंती व पुण्यतिथी ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्याचे आदेश जारी केला आहे. शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला असून त्याबद्दल शासनाचे आभार मात्र, अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जात नाही. आजही त्यांना जातीच्या चौकटीत पाहिले जाते असे मत वेताळ यांनी व्यक्त केले. यावेळी वेताळ यांनी संत रोहिदास महाराज यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. दरम्यान सरपंच स्वाती होले व सिताराम वेताळ यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते परशुराम होले, माजी सरपंच चांगदेव म्हेत्रे, ग्रामसेविका एल. बाचकर, ग्रामपंचायत सदस्या अर्चना म्हेत्रे, सारिका कांबळे, जीवन म्हेत्रे, उद्योजक बापूसाहेब मेहेर, उमेश म्हेत्रे, पोलिस पाटील गणेश वेताळ, कुंडलिक कांबळे, अशोक वेताळ, दत्तात्रय म्हेत्रे, रमेश म्हेत्रे, दत्तात्रय म्हेत्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब मेहेर व आभार उमेश म्हेत्रे यांनी मानले.



















