मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिंलीद राऊत
दि.०९.१०.२०२२
नवी मुंबई- रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तळवली-घणसोली येथे शिस्तबद्ध पद्धतीने समता सैनिक दलाच्या वतीने सकाळी ८.०० वा. धम्म ध्वजास सलामी देऊन मानवंदना देण्यात आली. यानंतर महापुरुषांना वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच नागरिकांना दसरा व ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख खाजामिया पटेल ऐरोली विधानसभा प्रमुख प्रकाश वानखेडे, उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव, दादा भालेराव, बाळासाहेब संगारे, युवा जिल्हाप्रमुख सुनील वानखेडे, विभाग प्रमुख सचिन जाधव, पंडित वानखेडे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत “धम्मचक्र प्रवर्तन” दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



















