मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.२२.०९.२०२२
ठाणे – भिवंडीतील जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा ,केंद्र कोशिंबी येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा वह्यावाटप कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्यावतीने संस्थेच्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सहशिक्षक तथा कास्ट्राईब कोकण विभाग उपाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
प्रास्ताविकात संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाविषयी माहिती देत संस्थेच्या विधायक कार्याला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी प्रा.निवृत्ती मगर सर,राजाराम भोईर,केतन ठाकरे,देऊ महाराज पालवी,रोहिणी पाटील, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते.