पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०२.२०२९
थेरगाव- गावठाण ‘ग’ प्रभागात शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी पिं.चि.महापौर माई ढोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जय शिवराय, शिवाजी महाराज की जय घोषणाने परिसर आनंदीत झाला होता. यावेळी मान्यवरांमध्ये वृक्ष प्राधिकरण सदस्य श्री.संभाजी बारणे नारी शक्ती संस्थेची अध्यक्षा सौ.पूजाताई सराफ, माजी नगरसेविका उषाताई चोरडिया, गिरीजाताई सराफ, बी.जे.अथवे, रामेश्वर पवार, चंद्रशेखर कदम, पर्यावरण व जल निर्भिड पत्रकार प्रतिनिधी श्री.मुझफ्फर इनामदार आदी मान्यवर व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















