पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,विजेंद्र गायकवाड़
अनेक विभागात कार्यरत असलेले कसामाजिक कार्यकर्त्यांचा एक ग्रूप बनवला गेला त्याचे नाव “समाज प्रबोधन ग्रुप”. इतर कोठेही वर्गणी गोळा न करता केवळ ग्रुपच्या सभासदांकडून स्वइच्छेनुसार जमा होणाऱ्या धम्मदान मधून जमा होणाऱ्या पैशातून हा व्हॉट्सॲप ग्रुप स्वाभिमानी धम्मपहाट कार्यक्रम सम्राट अशोका विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन ह्या दिवशी मोठ्या हर्ष उल्हासामध्ये साजरा करतो. गुरुवार दिनांक १८.१०.२०१८ पहाटे ५.३०वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक व प्रबोधनकार आयु. अनिरुद्ध वनकर ह्यांचा वादळवारा ह्या प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पाडला. पुणे शहराचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, उपआयुक्त ज्ञानेश्वर मोळक सर आणि मोळक मॅडम, पैगंबर शेख तसेच संभाजी ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. धम्मपहाट साजरे करण्याचे हे पाचवे वर्ष असून वर्षानूवर्षे ह्या पहाटेच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप घोगरे आणि आभार प्रदर्शन ग्रुपचे ॲडमिन विशाल सोनवणे ह्यांनी केले.



















