सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०६.२०२०
माळशिरस- नातेपुते येथील पर्वतेश्वर मंदिराजवळ शासनाचे शासकीय गोदाम आहे. त्या ठिकाणी नातेपुते व आसपासच्या परिसरामधील बाहेरगावावरून आलेल्या लोकांना क्वॉरेंटाइन सेंटर म्हणून बनवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी निर्भीड पत्रकार टीम यांनी सदिच्छा भेट देण्याचे ठरविले त्याप्रमाणे सर्व टीम त्या ठिकाणी पोहोचली. लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या व पाहणी केली असता असे निदर्शनास आले की भलेमोठे गोडाऊन त्याच्यामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, सेंटरमध्ये जेवणाची व्यवस्था नव्हती वीट भट्टीचे दोन कुटुंब त्याठिकाणी होती. त्यांना विचारणा केल्यावर गेल्या १२ दिवसांपासून अशीच अवस्था आहे असे समजले. आरोग्य तपासणी वेळेवर होते का असे विचारले असता समजले की २६ मे रोजी तपासणी झाली होती त्यानंतर कोणीही विचारायला आलेला नाही, स्थानिक प्रशासनाला जाब विचारला असता ते चेंडू एकमेकावर फेकत होते. हे काम आमचे नाही काहीतरी करू असं करतच गेल्या बारा दिवसांपासून आमची अशीच अवस्था आहे असे समजले. गावात जर तेल मीठ आणायला गेले तर दुकानातून हाकलून दिले जाते. नातेवाईक पाहुणे कोणीही जवळ करून घेत नाहीयेत मग खूप मोठा जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे एवढे हाल करणारा जबाबदार व्यक्ती कोण? त्याची नुकसान भरपाई करणार तरी कोण तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर आम्ही सेंटर २ मध्ये गेलो ते सेंटर मधुर मिलन कार्यालय पुणे पंढरपूर रोड वरती तिथे पोचल्यावर आठ ते दहा लोक होती मुंबई भिवंडी या ठिकाणाहून आलेली होती त्याही लोकांच्या व्यथा जाणल्या पण ती लोकं सेंटरमध्ये ही खुश होती कारण त्यांना सगळ्या व्यवस्था पुरवल्या जातात व वेळेवर आरोग्य तपासणी केली जाते आणि सगळ्या गोष्टी सुलभ होत्या मग आमच्या असे लक्षात आले की सरकार त्या वीटभट्टी कामगारांवर दुजाभाव तर करत नाही ना गरिबांसाठी एक व श्रीमंतांसाठी एक असं तर काही नसेल ना हा प्रश्न खूप सतावत होता वीटभट्टी कामगारांच्या भावना शब्दात मांडता येणे खूप अवघड होतं कोरोना किती मोठा महासंकट आहे हे त्या ठिकाणी गेल्यावर समजते. शासनाने याकडे लक्ष देऊन सुविधा कधी पुरविणार ? या कडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.



















