सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०३.२०२०
खंडाळा- पाडेगाव येथील उसाच्या शेतामध्ये ऊस तोड कामगार गर्दी करून काम करीत आहेत, पोलिस प्रशासनाने त्यांच्यावरती ठोस कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे
सातारा जिल्ह्यात १४४ कलमाची अंमलबजावणी सुरू असताना कोरोणा विषाणू व्हायरस बाबत प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे.
तरी हे शेतकरी ऊसतोड कामगार कायदा न जुमानता दिवसा ढवळ्या काम करीत आहेत.
पुणे-सातारा रोडवर हे ऊसतोड कामगारांचे दृश्य टिपले आहे. हे कामगार परप्रांतीय आहेत. त्यांनी कायदा का पाळु नये…?
याकडे प्रशासन लक्ष देईल काय…?
सातारा जिल्ह्यातील गोरगरीब झोपडपट्टीवासीय घराच्या बाहेर पडत नाहीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळतात उपाशीपोटी रहात असून हे ऊसतोड कामगार व त्यांचे शेतमालक यांना कायदा लागू होईल काय ..?
पोलीस प्रशासन त्यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे खंडाळा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.



















