सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०५.२०२०
करमाळा- पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी कुकडी प्रकल्पाच्या टेलच्या पाणी दुष्काळी भागाकडे वळवा अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने,जत,आटपाडी,कवठेमहांकाळ, तासगाव आणी मिरज या दुष्काळी भागाकडे वळवण्याचे नियोजन केले आहे.हा निर्णय अभिनंदनिय आहे, पथदर्शी आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीच्या धर्तीवर पुणे जिल्हयातील कुकडी प्रकल्पातील पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे पाणी कुकडी प्रकल्पाच्या टेलच्या भागाकडे पावसाळ्यात वळवल्यास या भागतील शेतकरी वर्गाला फार मोठा फायदा होईल व त्यांच्या कपाळावरील दुष्काळी भागाचा शिक्का आपल्या एका निर्णयाने कायमचा पुसला जाईल.
सांगली जिल्ह्याप्रमाणेच पुराच्या पाण्याचे नियोजन कुकडीच्या प्रकल्पाच्या बाबतीत करावे.यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील धरणे, अनेक मध्यम प्रकल्प,लघु प्रकल्प,नद्यावरील बंधारे,अनेक मातीनाला बांध भरून घेता येतील.यामध्ये प्रामुख्याने करमाळा तालुक्यातील मांगी तलावसह अनेक छोटे मोठे तलाव,कोळगाव धरण व सीना नदीपत्रावरील सात बंधारे भरून घेता येतील.यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन त्यांच्या जीवनात नंदनवन फुलणार आहे.शेती उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावणार आहे.
सांगली जिल्यातील पुरच्या पाण्याच्या नियोजनाप्रमाणे कुकडीचे अतिरिक्त कर्नाटकमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करून ते पाणी श्रीगोंदा, कर्जत,करमाळा,परंडा या तालुक्यातील कायम दुष्काळी भागाला वळवण्याचा निर्णय घेण्यात यावा.असे निवेदनात म्हटल आहे. ◆ सांगली जिल्ह्याप्रमाणेच पुराच्या पाण्याचे नियोजन कुकडीच्या प्रकल्पाच्या बाबतीत करावे.
◆ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील धरणे, अनेक मध्यम प्रकल्प,लघु प्रकल्प,नद्यावरील बंधारे,अनेक मातीनाला बांध भरून घेता येतील.यामध्ये प्रामुख्याने करमाळा तालुक्यातील मांगी तलावसह अनेक छोटे मोठे तलाव,कोळगाव धरण व सीना नदीपत्रावरील सात बंधारे भरून घेता येतील*.
◆ पुणे जिल्हयातील कुकडी प्रकल्पातील पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे पाणी कुकडी प्रकल्पाच्या टेलच्या भागाकडे पावसाळ्यात वळवल्यास या भागतील शेतकरीवर्गाला फार मोठा फायदा होईल व त्यांच्या कपाळावरील दुष्काळी भागाचा शिक्का आपल्या एका निर्णयाने कायमचा पुसला जाईल
◆ लाखो शेतकऱ्यांना होईल याचा फायदा



















