पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०३.२०२०
पुणे- पुण्यात बनावट सॅनिटायझर तयार करून नामांकित कंपनीच्या नावे विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. यावेळी पोलिसांनी एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बनावट मास्क आणि सॅनिटायझरची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी कारवाई करून अजय शंकरलाल गांधी, मोहन चौधरी, सुरेश छेडा (राहणार सर्वजण पुणे ) या तिघांना अटक केली आहे. मुंबई येथील एका कंपनीतून ही टोळी काही माल आणून त्याचे पॅकिंग करून विक्री करत होती. संबंधीत मुंबई येथील कंपनीत पोलिसांचे एक पथक पोहोचले असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे.



















