सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०२.२०२०
महाबळेश्वर- बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय सामाजिक संघटनेच्या महिला तालुकाध्यक्षपदी महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेविका श्रद्धा रोकडे तर शहराध्यक्षपदी उमेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांच्या हस्ते श्रद्धा रोकडे व उमेश रोकडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी नगरसेविका श्रध्दा रोकडे यांनी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या सामाजिक संघटनेमधे समर्थकांसह जाहीर प्रवेश करीत असल्याचे घोषित केले.

यावेळी जेष्ठ समाजसेविका व माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे, रमेश रोकडे, मीरा रोकडे, अनिता मोरे, सुरेखा कांबळे, रेश्मा कांबळे, भारती मोरे, संगीता कांबळे, सुजाता मोरे तालुकाध्यक्ष सुमित कांबळे, अमोल काकडे यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शहराचा विकास होण्यासाठी श्रद्धा रोकडे यांना संघटना पुर्ण बळ देईल असे नमूद करून समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे किरण शिंदे यांनी विशद केले. तर येत्या काळात संघटना अधिक बळकट होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे श्रद्धा रोकडे यांनी म्हटले आहे.आभार प्रदर्शन सुमित कांबळे यांनी केले.या घडामोडीमुळे संघटनेचे बळ अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.



















