सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.११.२०२०
शिरवळ- प्रजापिता ब्रह्माकुमारीज या ईश्वरीय विश्वविद्यालय यांची एक नवीन उपशाखा आता शिरवळ (स्टार सिटी) या परिसरात सुरु करण्यात आली आहे. या विश्व विद्यालयाच्या जगभरातील १४० देशापेक्षाही जास्त देशामध्ये ८००० पेक्षाही जास्त सेवाकेंद्र आहेत. आज समाजात भय, चिंता, नैराश्या वाढतच आहे परिणाम स्वरूप हिंसा, आत्महत्या हे प्रमाण सुद्धा वाढताना दिसत आहे. यावर कुठलेही औषध कारगीर ठरु शकत नसुन फक्त अध्यात्मिक ज्ञान व योग याचाच फायदा होत आहे. याच शुभभावनेतुन हि शाखा सुरू करण्यात आली आहे तरी या संधीचा फायदा सर्वधर्मीय लोक घेऊ शकतात. या निमीत्ताने ब्रम्हकुमारीज भोर उपसेवा केंद्राच्या संचालीका मीनाक्षी दिदी व ब्रम्हकुमार व ब्रम्हकुमारी उपस्थित होते.या निर्भीड पत्रकार या वर्तमान पत्रकाचे मुख्य-संपादक नंदकुमार जोगदंड, संपादक किरण शिंदे सह निर्भीड पत्रकारची टीम उपस्थित होती.



















