नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०५ .२०२०
येवला- विनापरवानगी शहरात आलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर वाॅर्डनिहाय समित्या गठीत करावी व प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे आदेश येवला उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक वाॅर्डात समित्या गठीत करण्यात आली असल्याची माहिती येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी दिली.
येथील कोरोणा बधितांची संख्या ३२ वरुन शून्य झाली होती पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासन सत्रक झाले आहे. गुरुवारी काढलेल्या आदेशात पालिका कार्यक्षेत्रात मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव व कोरोनाबधित परिसरातून कोणीही विनापरवानगी येणार नाही. याची दक्षता घ्यावी आशा सक्त सूचना देण्यात आल्या. परंतु कोणी विनापरवानगी आल्यास त्याला वास्तव्य करू देऊ नये व आशा व्यक्तींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मात्र परवानगी घेऊन आल्यास त्याला १४ दिवस होम क्वारांटाईन करावे तसे शक्य नसल्यास संस्थागत अलागिकरन करण्यात येऊन सर्व सुविधा पुरवाव्यात या व्यक्तींनी क्वारांटाईनचा भंग केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच यातील कोणाला कोरोना संदर्भात लक्षणे दिसून आल्यास आरोग्य विभागाला माहिती द्यावी. पालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवसाय व दुकानांची नियमित तपासणी करण्यात यावी, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या चालकाने रोज आरोग्य तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच स्वखर्चाने पालिकेकडून वाहन निर्जतुकिकरन करून घेणे. असे आदेश देण्यात आले.



















