मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनीधी, संदीप पतंगे
दि.२५.०८.२०२२
शहापूर- शहापूर तालुक्यातील उबरखांड येथील एका घरामध्ये बिबट्या अचानक मध्यरात्री दाखल झाला. मुबई नासिक रोड बाजूला असलेल्या उबरखांड या गावात रात्री मध्यरात्री गाव उबरखांड येथील निमसे यांच्या घरा बाहेर मध्यरात्री पाळीव कोंबडी-कोंबड्याने अचानक पणे ओरडणे, जोर जोराने आवाज देणे सुरु केले असता निमसे परिवारातील मधुकर लहू निमसे हे घराबाहेर आले त्याच वेळेचा फायदा घेऊन बिबट्याने केला निमसे यांच्या घरामध्ये प्रवेश केला. मधुकर लहू निमसे यांनी आपल्या घरा मध्ये बिबट्या हा दरवाजा उघडा पाहून घरात गेला आहे, हे त्यांच्या लक्षात आले व त्याने लगेच चाणाक्षपणे आपल्या पत्नी व इतर कुटुंबाला सावध केले. हा बिबट्या घरात आला आहे, हे शब्द एकूण सर्वांची घबराट होवून झोप उडाली. आलारे आला बिबट्या आला अश्या आरोळ्या देऊन गावाला जागे करण्यात आले. कारण काही २ ते ३ दिवसा पूर्वी पिवळी रोड वर दुपारी ३ ते ४ वा च्या दरम्यान एका बिबट्याने रोड बाजूला गवत खात असलेल्या पाळीव गाईच्या मानेला पकडून तिचा जीव घेतलाल्याची घटना घडली होती.

या बातमीने सर्वत्र बिबट्याची दहशत पसरली होती परिणामी सोभावतली गाववाले भयानक घाबरले होते. पण निमसे घरातील मधुकर लहू निमसे हे हुशार व चाणाक्ष तसेच निडर असल्याने घरातील पत्नीला सावध करून मुलांची काळजी घे हे त्यांनी आपल्या पत्नीला सागितले, व त्या घरामधील मुख्य दरवाजातील व आतील भागाचा म्हणजे हॉलचा दरवाजा बंद केला व घरात दाखल झालेल्या बिबट्याला डांबून घरात बंद करून ठेवले व पत्नी व मुलांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवले. वनविभागापर्यंत बातमी पोहचली असता खर्डी व शहापूर वन विभागातील अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी, व ग्रामस्थ तात्काळ घटनासथळी दाखल झाले बोरीवली वनविभागाची रेस्कयू टीम बोलावून त्या बिबट्याला अखेर पकडण्यात यश आले.

खर्डी येथील आजूबाजूच्या गावमध्ये आत्ता सद्या भीतीचे वातावरण असल्याचे ग्रामस्थांच्या बोलण्यातून दिसून येते. शहापुर-पिवळी व शहापुर- तानसा या अभयारण्याच्या रस्त्यावरुन प्रवाशांनी सतर्कतेने प्रवास करावा व वनविभागाने याबाबत लोकांना संरक्षण द्यावे अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.



















