सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,धीरज जगताप
दि,२७.३.२०२०
फलटण- देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन संचारबंदी असताना नागरीक विनाकारण रस्त्यावर दुचाकी वाहन घेवून फिरत असल्याने सुरक्षेच्या कारणावरून सदर वाहन चालक यांचेवर कारवाई करण्यात आली असल्याचे फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ? प्रताप पोमन यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असताना महसूल व पोलीस प्रशासन यांनी फलटण शहरात संयुक्तरित्या मोकाट रस्त्यावर फिरणाऱ्या ६०/७० वाहन चालकांवर कारवाई केली असून प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप व पोलीस निरीक्षक प्रताप पोमन यांनी कारवाई केली आहे.
फलटण शहरात करोना विषाणू पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असताना अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व नागरीक यांचेतील फरक लक्षात येत नसल्याने शासकीय आदेश असताना संयुक्तरित्या मोकाट रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालक यांचे वाहनांवर कारवाई करुन गाड्या जप्त करुन पुढील कारवाई सुरु असल्याचे प्रताप पोमन यांनी सांगितले.
फलटण शहरात करोना विषाणू पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असताना नागरीक यांनी घरातच थांबावे व आपली आणि कुटुंबीय यांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.



















