वारी हनुमान येथे तीव्र पाणीटंचाई; मोफत पाणीवाटपाला सुरुवात; जि.प. सदस्य भगतसिंग (राजू) पवार यांच्या पुढाकारातून नागरिकांना दिलासा
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, जितेंद्र तायडे
दि. १७.०७.२०२६
संग्रामपुर- वारी हनुमान येथील १४० गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छता व तात्पुरत्या दुरुस्तीच्या कामामुळे गावातील पाणीपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जि.प. सदस्य भगतसिंग (राजू) पवार यांनी ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रियांका राहुल मेंगणे, उपसरपंच श्रीमती पंचफुलाबाई पवार* तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने गावात मोफत पाणीवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
१६ जुलै पासून पाण्याचे टँकर गावातील प्रमुख मार्गांवर फिरवून नागरिकांना मोफत पाणीपुरवठा केला जाणार आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. सदस्य भगतसिंग (राजू) पवार आणि ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.



















