निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दिनांक १५.०२.२०२६
भीमा कोरेगाव – वीर गोविंद गोपाळ महार सामाजिक विकास ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन वढू बुद्रुक येथे ज्येष्ठ नागरिक मा.ग्रामपंचायत सदस्य शंकरराव गायकवाड, बळीराम गायकवाड यांचे हस्ते रिबीन कापून तसेच ज्येष्ठ समाजसेवक किरण गोरखनाथ शिंदे, गोविंद गोपाळ महार यांचे वंशज पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, विजय गायकवाड यांचे मुख्य उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना किरण शिंदे यांनी वीर गोविंद गोपाळ महार यांचे इतिहासातील कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होण्याची आवश्यकता असून या ट्रस्टच्या माध्यमातून गावाचा,समाजाचा विकास साधण्याचे कार्य होणार असल्याचे सांगितले. तसेच सदरील ट्रस्टचे कार्य २०१९ पासून सुरू असून आज या कार्यालयाची निर्मिती करून ट्रस्टच्या कार्याला गती प्राप्त होणार असल्याचे नमूद केले. यावेळी आपल्या ट्रस्ट मध्ये गावातील बौद्ध समाजातील सर्वांचा प्रातिनिधिक समावेश केला असल्याने सदरील ट्रस्टचे कार्य उत्तम रीतीने सर्वांच्या साथीने पूर्ण होणार असून उपस्थित सर्व ग्रामस्थांचे विजय अर्जुन गायकवाड यांनी आभार मानले. येत्या काळात शंभूराजांचे देहावर सन्मानपूर्वक अंत्यविधी करणाऱ्या गोविंद गोपाळ महार यांचे समाधीचा विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे गोविंद गोपाळ यांचे वंशज व ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास शंकरराव गायकवाड, बळीराम गायकवाड, अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष संदीप गायकवाड, सचिव किरण शिंदे, खजिनदार विजय गायकवाड, सदस्य रेखा गायकवाड, सदस्य अंजना गायकवाड, माया गायकवाड, अर्चना गायकवाड, रुपेश गायकवाड, विकास गायकवाड, शैलेश गायकवाड, महेंद्र गायकवाड, सुनील गायकवाड, राजू गायकवाड, मोनी गायकवाड, राहुल गायकवाड, शुभम गायकवाड, सनी कांबळे, अमोल पटेकर, पप्पू पटेकर, गणेश गायकवाड, विकास ओव्हाळ, निर्भीड पत्रकार वृत्तपत्राचे संपादक नंदकुमार जोगदंड, स्वप्निल इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक दशके उपेक्षित राहिलेल्या इतिहास पुरुष वीर गोविंद गोपाळ महार यांच्या समाधी परिसराचा विकास होण्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी बोलून दाखवली या ट्रस्टच्या माध्यमातून आता या समाधीस्थळाचा विकास होणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.



















