बापुसाहेब हे सामान्यांचे आधार: खासदार नीलेश लंके
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.११.२०२४
▪️वडगाव शेरीचा चेहरा मोहरा बदलेन- बापूसाहेब पठारे वडगाव शेरी- वडगावशेरी मतदार संघाचे महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आयोजित परिवर्तन महासभेत अहिल्यादेवीनगरचे खासदार नीलेश लंके यांनी घणाघाती भाषण करुन पठारे यांच्या विजयाचे आवाहन केले. 50 हजार मतांनी ते निवडून येतील, हे विश्वासाने सांगितले.महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. संविधानाची प्रत पठारे यांना भेट देण्यात आली. अनेक व्यक्ती, संघटनांनी पाठिंब्याचे पत्र दिले. वडगावशेरी हा मिनी इंडिया असून तो आदर्श करु, अशा भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. मारुती गलांडे यांनी आभार मानले.नीलेश लंके म्हणाले, या परिसराचे परिवर्तन व विकास हा बापूसाहेब पठारे यांनीच केला. संकट समयी आधाराचे केंद्र बापूसाहेब पठारे यांनी निर्माण केले. नगरचे नागरिक येथे मोठया प्रमाणावर मतदार आहेत. ते तुतारी लाच मतदान करतील. खरे कार्यसम्राट बापूसाहेब आहेत, सामान्यांचे ते आधारवड आहेत. शरद पवार यांना झालेल्या त्रासाची भरपाई केली पाहिजे. सत्तारूढ लोक लबाड आहेत, महविकास आघाडी सत्तेवर येणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे. पुढे शेतकरी, महिला, बेरोजगार वर्गासाठी काम करु.बापूसाहेब पठारे म्हणाले, प्रतिस्पर्धी उमेदवार खोटारडा आहे . त्यांनी १० कोटीची कामे दाखवावी,१५०० कोटीची भाषा करु नये. पवार साहेब हे आमचे दैवत आहे. टँकर वापरल्याचा आरोप करणाऱ्यांनी पाण्याचा कधीच प्रश्न सोडवला नाही. आपण जिंकणार आहोत. आणि चांगले परिवर्तन या मतदारसंघात घडवणार आहोत.



















