चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०२.२०२०
🔹शेकडो नागरिक संतप्त, कार्यालयात मांडले ठाण
🔹संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी स्विकारले निवेदन,मागण्या पुर्ण करण्याची दिली हमी
पोंभुर्णा- पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत वेळवा गावात सरपंच व उपसंरपच यांच्या हलगर्जी व मुजोर कारभारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्येला कंटाळून गावकऱ्यांनी आपल्या हक्कांच्या मागण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासना विरोधात गावकऱ्यांनी आपला रोष निर्माण करीत ग्रामपंचायत कार्यालयावर शेकडो नागरिकांनी ‘भिक-मांगो आंदोलन केले.
शेकडो नागरिकांनी या भिक-मांगो आंदोलनातून आपल्या प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करुन या आंदोलनाचे निवेदन व गावकऱ्यांच्या विविध समस्या, याचे निराकरण करण्यासाठी आलेल्या संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांना सांगितले.
समस्याग्रस्त गावकऱ्यांच्या भिक-मांगो आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता, माजी ग्रामपंचायत सदस्य रुपेश निमसरकार यांनी केले तर सह नेतृत्वात पंकज वडेट्टीवार, साईनाथ लोणारे, मोमीता जाधव ग्राम पंचायत सदस्य वेळवा, माधवराव सोनटक्के, किशोर केमेकार, यांचा समावेश होता.
निवेदनात खालील प्रमाणे अनेक समस्या मांडण्यात आल्या त्यामध्ये पात्र व गरजू नागरिकांना त्वरित घरकुलाचा लाभ देण्यात यावा, विद्यमान संरपंच शारदा इंगोले यांच्या पतीच्या नावाने मिळालेल्या घरकुला संबधी योग्य चौकशी करून त्वरित कारवाई करण्यात यावी, हनुमान मंदीरा जवळ मंजूर असलेले सिमेंट क्रांक्रिटीकरण त्वरित करण्यात यावे, मौजा सेल्लूर नागरेड्डी गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेले ग्रामपंचायत सदस्य सुनील कोतपल्लीवार यांचा खर्रा ठेला व खासगी व्यक्तिचे असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित हटविण्यात यावे, मौजा सेल्लूर नागरेड्डी येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता त्वरित बांधण्यात यावा, ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक भुंखडावर असलेले अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, रोजगार हमीची कामे त्वरित सुरु करण्यात यावी, पदाचा गैरवापर करुन गावकऱ्यांची दिशाभुल करणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पद खारिज करण्यात यावे, मौजा वेळवा येथील आरोग्य उपकेंद्राची नवीन इमारत गावातच बांधण्यात यावी, मागील दोन वर्षापासून रखडलेली तंटामुक्त समितीची निवड त्वरित करण्यात यावी, ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध समित्या त्वरित गठीत करण्यात याव्या अशा अनेक मागण्यांना घेऊन गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना ‘भिक-मांगो आंदोलनाच्या’ वतीने देण्यात आले.
या मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन व ग्रामपंचायत प्रशासनाला कारवाई संबधी आदेश देण्याचे आश्वासन संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी गावकऱ्यांना दिले.
या मोर्चात सहभागी रघुनाथ बांबोळे, दौलत देवगडे, विनोद जाधव, रजत वडेट्टीवार, टिकादास उराडे, मल्लना कावटवार, गुरुदास मेश्राम, देवीदास कामटकार, किरण लोणारे, आदी मागण्या घेऊन शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. या गावकऱ्यांच्या मागण्या जर येणाऱ्या पंधरा दिवसात मंजूर झाल्या नाही तर पंचायत समिती कार्यालयात जाऊन संवर्ग विकास अधिकार्यांना काळे फासणार असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.



















