सोलापूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०१.०२.२०२०
वेळापूर- पंढरपूर माळशिरस रोडवरील वेळापूर येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात इर्टिगा कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर खुडूस दरम्यान शिवामृत पाटीच्या वेळापूरच्या बाजूकडे इर्टिगा कार आणि सिमेंट भटलेला टँकर यांचा समोरासमोर धडक दिल्याने अपघात होऊन कार मधील पाचजण जागीच ठार झालेले आहेत. त्यामधील एका लहान मुलीस रुग्णालयात उपचारासाठी पाठवलेली आहे.
वैरागचे फलफले कुटुंब जेजुरीला दर्शनासाठी निघाले होते. फलफले हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरोग्य विभाग सांभाळणारे ओम प्रकाश शेटे यांचे दोन मेहुणे, त्यांच्या पत्नी एक मुलगा हे मृत्युमुखी पडल्याचे कळते. अन्य दोन महिला गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. वेळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे.



















