पुणे ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी,
दि.२३.०८.१८
पुणे,महाराष्ट्रात घडलेली विचारवंतांची हत्यासत्र,बॉम्ब व बाँब बनविण्याचे साहित्य सापडणे,बॉम्बस्फोट घडविणे या व अशा अनेक देशविघातक कारवायांमध्ये आजवर अनेकदा सनातन संस्थेच्या साधकांचे नाव समोर आले आहे.त्याचप्रमाणेडॉ.दाभोलकर, कलबुर्गी,गौरी लंकेश, पानसरे या विवेकवाद्यांच्या हत्ये मध्ये देखील सनातन संस्थेचे साधक असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.या सर्व बाबी अतिशय गंभीर असून भारत देशाच्या अखंडतेला बाधा आणणाऱ्या आहेत.त्यामुळे सनातन संस्थेवर त्वरित बंदी घालण्यात यावी अशा देशविघातक कारवायांमध्ये सामील संबंधित साधकांवर व सनातन संस्थेचे संस्थापक ‘जयंत आठवले’ यांच्यावर त्वरित अटक करण्यात यावी तसेच त्यांचेवर रा.सु.का.अंतर्गत कारवाई करण्यात यावी.सनातनचे आश्रम तपासले जावेत व ते सील करण्यात यावेत या मागण्यांसाठी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य तर्फे राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी पुणे यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे,सुमित गायकवाड, अमित माने,विकास ओव्हाळ,सुमित कांबळे,सिद्धार्थ कदम उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुणे यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी निवेदन स्वीकारले.



















