पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०४.०१.२०२२
इंदापूर- पंचायत समितीचे सभागृहात सभापती स्वातीताई शेंडे व उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या प्रमुख रोहिणी राऊत म्हणाल्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ब्युटी पार्लर चे सर्व कोर्स ,शिलाई मशिन क्लास चालवून मार्गदर्शन करण्यासाठी समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्था स्थापन केली आहे.संस्थेमार्फत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीवर नेहमीच आमचा भर राहील.महिलांचा विकास आणि स्वावलंबन हाच आमचा उद्देश असून तो निश्चित आम्ही पूर्णत्वास नेऊ. उपस्थित मान्यवरांचा स्वागत रोहिणी राऊत यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, पो.उप.निरीक्षक अपर्णा जाधव,निर्भया पथकाच्या पोलीस हवालदार माधुरी लडकत,रुपाली परीट,डॉ अश्विनी ठोंबरे,विस्तार अधिकारी छाया धापटे, तेजपृथ्वी ग्रुपच्या अनिता खरात,अंगणवाडी संघटनेच्या तालुकाध्यक्षा बकुळा शेंडे, केंद्रप्रमुख सुनीता कदम,केंद्रप्रमुख संभाजी आजबे, शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल,नानासाहेब नरुटे, सुहास मोरे यांसह महिला,युवती व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.