सांगली(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०३.२०२०
सांगली- जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आत्ता २४ वर गेला आहे. एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा विळखा पडला आहे. नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आलेला २ वर्षांचा मुलगा त्याच कुटुंबातील असून यापूर्वी देखील या घरातील लहान मुलांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी ते निगेटिव्ह होते. काल तिघांचे रिपोर्ट पाठवले त्यात एका मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सांगलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील नातेवाईकांसह २४ जण आहेत. तर पेट वडगाव येथील महिला इस्लामपूर येथील रुग्णाची नातेवाईक आहे. या सर्व रुग्णांवर मिरजमधील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. मिरजमध्ये उपचार घेणाऱ्या संख्या २५ वर पोहचली आहे.
• संख्या वाढत असताना दिलासादायक माहिती
सांगली जिल्हातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण याआधीही महाराष्ट्रात अनेक कोरोनाबाधितांवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे.



















