मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०९.२०२२
पालघर- जव्हार तालुक्यातील साकुर गाव येथील श्रीधर डंबाळी यास लखवा मारला होता त्यामुळे त्याला अपंगत्व प्राप्त झाले होते. त्यास चालणे, हालचाल करणे यासाठी खूप त्रास सहन करून जीवाचा अटापिटा करावे लागत होते. शरीराच्या या दुर्दैवी परिस्थिती मुळे त्यास दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. लखवाग्रस्त श्रीधरची ही नाजुक अवस्था गावातील माजी सैनिक संतोष पवार यांनी ओळखून त्यास अपंग सायकल भेट देऊन एक मोठा मदतीचा हात पुढे केला.
माजी सैनिक संतोष पवार यांनी यशस्वीपणे देशाची सेवा करून सेवानिवृत्तीनंतर देखील ते आता अशा प्रकारे लोकांची मदत करून समाज कार्यात आपले मोलाचे योगदान देत असतात. सामाजिक बांधिलकी जपत लखवाग्रस्तास अपंग सायकल भेट देऊन एक मोठा मदतीचा हात त्यांनी पुढे केला आहे. या माध्यमातून श्रीधर डंबाळी व त्यांच्या कुटुंबास एक मोठा आधार मिळाला.
या प्रसंगिक तुंबडा सर, भोंडवा सर, प्रदिप डंबाळी, प्रमोद निखंडे समाजसेवक व स्वतः संतोष पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सैनकांच्या या कामगिरी बद्दल गावातून त्यांचे कौतुक होत आहे.



















