नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.२७.११.१९
नाशिक- शहरातील विंचुर चौफुलीवरील भारत रत्नं डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुताळ्या जवळ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते डाॅ बाबासाहेबांचा विजय असो, संविधानाचा विजय असो संविधान अमर रहे अशा घोषणा देत संपुर्ण परिसर दणाणून सोडत होते बौद्ध, ख्रिस्चन, हिंदु, मुस्लिम धर्माचे धर्मगुरू विंचुर चौफुलीवरील येताच त्यांचे मोठ्या उत्सवात स्वागत करण्यात आले यावेळी माननीय तहसीलदार रोहिदास वारूळे साहेब यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुताळ्यास हार अर्पण करून दिप प्रज्वलन केले तसेच नगरपालिकेचे मुख्य आधिकारी पाटील साहेब शहर पोलिस निरीक्षक संदिप कोळी साहेब ग्रामीण पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे साहेब, यांनी सर्व धर्मगुरूचे शाल पुष्प व सविधान प्रत देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सौ.आशा आहेर यांनी संविधानाचा उदेदिष्यचे वाचन करून सर्वांकडून ग्रहण करून घेण्यात आले त्यानंतर पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली संविधान गौरव रॅलीला सुरवात झाली या रॅलीला तहसीलदार रोहिदास वारूळे साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवतला सुरवात झाली या रॅली मध्ये महीला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या रॅली शहरातून मुख्य बाजारपेठेतुन आझाद मैदानावर गेली तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुताळाला पुष्पहार अर्पण करून मुक्ती भुमीवर जाऊन भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुताळ्याचे पूजन करत तेथे उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात सभेत रुपांतर करण्यांत आले यावेळी महेंद्रभाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरवात झाली यावेळी मुस्लिम समाजाचे नेते बेग साहेब ख्रिस्चन समजाचे धर्म गुरू पिटर काळे , बौद्ध धर्माचे धर्मगुरू मोग्गल्यन (परभणी)येवला शहर पोलिस निरीक्षक संदिप कोळी साहेब यांनी मनोगत व्यक्त केले संविधानाचे व बाबासाहेबाचे महत्व सांगितले यावेळी अध्यक्षीय भाषणात महेंद्र पगारे म्हणाले की भारतीय संविधानामुळे सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात म्हणून संपुर्ण जगाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व त्यांनी दिलेल्या संविधानाला स्विकारलेले आहे परंतु काही मनुवादी वृत्तीचे लोक संविधानाची पायमल्ली करून समाजात तेढ निर्माण करत आहे काही लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहे तर काही लोकांनी संविधान जाळण्याचा प्रयत्न करीत आहे हे सर्व देशाला धोक्यात आणुन आरजक्ता पसरविण्याचा प्रकार आहे हा देश जर आबादीत ठेवायचा असेल तर संविधानाची काटेकोरपणे पालन करून अंमलबजावणी करणं गरजेचे आहे जर लोकशाही टिकवायची असेल तर संविधाना शिवाय पर्याय नाही म्हणून सर्व धर्मातील लोकांना भारतीय संविधान गरजेचं आहे म्हणुन या उद्देशाने आज सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन संविधान रॅलीच्या माध्यमातून एकतेचा संदेश येवला तालुक्यातील सर्व आधीकारी धर्म गुरू शैक्षणिक सामाजिक एकत्र येऊन एकतेचा व समतेचा संदेश संविधान दिनी रॅलीच्या माध्यमातून दाखवला ही अभिमानाची गोष्ट आहे असे गौर उदगार महेंद्रभाऊ पगारे यांनी व्यक्त केले
यावेळी सुत्रसंचालन आशा आहेर यांनी केले तर प्रास्ताविका वाचन विजय घोडेराव यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते वसंत घोडेराव, विजय घोडेराव, बाळासाहेब आहिरे, नवनाथ पगारे, राम कोळगे, शशिकांत जगताप, विनोद त्रिभुवन,निलेश खळे,विजय पगारे, आकाश घोडेराव, हमजाभाई मनसुरी, कृष्णा पगारे, निवृत्ती संसारे, संतोष गायकवाड, सौ,आशा आहेर, कांताबाई गरूड, रंजना पठारे, संगीता गायकवाड, नंदिनी पगारे, ज्योती पगारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महीला उपस्थित होते.



















