नाशिक (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०६.०१.२०२०
नाशिक- रोजच्या धावपळीच्या, इंटरनेटच्या युगात एकमेकांशी या माध्यमातून आला खरा, परंतु त्यात आत्मियता प्रेम आपुलकी भाव शिल्लक राहिला नाही. माणूस जवळ आला परंतु तो मनाने खुप दुर निघुन गेल्याचे चित्र आज समाजात वावरताना आपणाला दिसून येत आहे. सध्या माणूस एकमेकांच्या दुःखात व आनंदात सहभाग घ्यायला सुध्दा वेळ काढत नसल्यामुळे तो फक्त एसएमएस, व्हाॅटसअप, इंटरनेट वर पोस्ट टाकुन आपले कर्तव्य समजु पहात असल्याने माणूस मनाने खुप दुर गेला आहे. त्यामुळे समाजात कुठतरी लोक ही आपुलकी शोधू पहात आहे म्हणून की काय आज येवला तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयाचे १९८६ इयत्ता दहावी या वर्षांपूर्वीचे वर्गातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी यांनी स्नेहसंमेलन मेळावा आयोजन करून संपुष्टात आलेला हा स्नेह मेळावा साजरा करून स्नेह जपण्याचे काम खऱ्या अर्था करण्यात आले आहे. मेळाव्यात सरस्वती पूजन करून स्नेहसंमेलन सुरू करण्यात आले तत्कालिन वर्गमित्र मैत्रीणी यांनी परीचय कथन करूंन आनंद व्यक्त केला. शिक्षणानतंर सर्वच वर्गमित्र मैत्रीणी आपल्या नोकरी व्यवसाय साठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, गुजरात अशा शहरात गेले असल्याने एकत्र यावे आणी शालेय स्नेह पुन्हा मिळावा म्हणून स्नेहमेळाव्याचे खास आयोजन शबानाा शेख, प्रतिभा जाधव, पुष्पा वरे, लता पाटील, राजेश साळुंखे, कांतीलाल क्षिसागर, बाळकृष्ण राजगुरु, शातांरामभाऊ दुनबळे, साईनाथ कदम, सतिश गंवादे, बाळासाहेब शेटे, यांनी केले. यावेळी गायन, चारोळ्या खेळ खेळत डाॅ.राजेश साळुंखे यांनी त्यांच्या चाणंक्य कला पथक, गायक शाहीर संजय आव्हाङ व राजेश साळुंखे यांनी कला गुणांचा वापर करून मनमुराद आनंद साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे शबाना शेख व शेख रशीदबाबुभाई सर, लता पाटील, मेजर पाटील, पुष्पा व प्रकाश वावधाने याचा सत्कार करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. मेळाव्याचे सुत्रसचांलन एजाज देशमुख, डाॅ. राजेश साळुंखे, शातांरामभाऊ दुनबळे, साईनाथ कदम, यांनी केले तरआभार कृष्णा आहेर श्रीकांत संधान, सतिश गंवादे यांनी मानले याप्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थी बाळासाहेब पिपंरकर, गणेश पाटील, प्रकाश ढोपरे, साहेबराव दौंडे, दत्ता लाडंबिले, रविंद्र राजगुरु, रमतुल्ला चौधरी, खडेराव जगताप, राजाराम कदम, किसन कदम, पोपट जाधव, निवृत्ती ठोंबरे, साहेबराव कांदळकर, गोरख तनपुरे, नानासाहेब आभाडे, भाऊसाहेब बढे, मधुकर पवार, विक्रम भुसारे, दुल्हेमिया मुलांनी, अण्णा दौंडे, काका सोनवणे, रविंद्र राजगुरु, उदय शिंदे, रामभाऊ नाईकवाङे, शरद झाल्टे, पोपट जाधव, विश्वास सोनवणे, केदु पगारे, सह माजी विद्यार्थी बालमित्र उपस्थित होते.



















