४ जुलैचा हवामानाचा इशारा; ११ राज्यांत मुसळधार पाऊस, ताशी ९० किमी वेगाने वारे; IMDचा अलर्ट
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क. प्रतिनिधी, विशाल शिंदे
दि.०३.०६.२०२६
मुबई – देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून ४ जुलै रोजी ११ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान तसेच मध्य प्रदेशातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वीज पडण्याचाही धोका व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोकण, मुंबई महानगर परिसर आणि घाटमाथ्यावरील भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, झाडे, वीज खांब व अस्थायी बांधकामांपासून दूर राहावे तसेच हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.



















