मुंबई व पुण्यात ‘आऊट ऑफ सिल्याबस – पुस्तकांच्या पलीकडे’ चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद; हाऊसफुल शोने रचला नवा विक्रम!
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, मनोज पोहरकर
दि.०३.०६.२०२६
पुणे – आंबेडकरवादी विचारांचे अभ्यासक आणि वक्ते सुगतदादा वाघमारे निर्मित “आऊट ऑफ सिल्याबस – पुस्तकांच्या पलीकडे” हा सामाजिक आशयाचा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून, प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबईतील INOX नरिमन पॉईंट येथे झालेला शो हाऊसफुल ठरला. त्याचप्रमाणे पुण्यातील शो देखील प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडत असून, अनेकांनी त्याचे कौतुक केले.
चित्रपटाला मिळालेल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल निर्माते सुगतदादा वाघमारे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, सहकाऱ्यांचे आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “हा केवळ एक चित्रपट नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”
सामाजिक आशय आणि प्रेरणादायी संदेशामुळे “आऊट ऑफ सिल्याबस – पुस्तकांच्या पलीकडे” हा चित्रपट राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.



















