तेल्हारा येथील मिलिंद बुद्ध विहारात १२ व्या दिवशी धम्मग्रंथाचे पठण…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, रवींद्र विरघट
दि.१३.०८.२०२६
तेल्हारा- मिलिंद नगर बुद्ध विहार मध्ये वर्षावास, प्रवचन मालिका, ग्रंथ पठणाचे औचित्य साधून शनिवार दि. ९ ऑगस्ट२६ ला रात्री ९ ते १० वा. या कालावधीत पूज्य भंते ज्योती पुत्र यांनी १२ व्या दिवशी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील माहिती देताना सांगितले की, राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या मागे मागे गेला . आणि मोठ्या आदराने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या शरीर स्वास्थ्या विषयी विचारपूस केली आणि गौतमाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधी पासून मुक्त असल्याची खात्री दिली…. यावेळी प्रकाश दिघे, शांताराम निखाडे, मोहन खंडारे, नंदू वानखडे, विलास तायडे, अमर भारसाकळे, सौ निकिता सपकाळ, तनुश्री सपकाळ, श्रद्धा सावंग, सीमा कराईत, श्रावणी भोजने, जयश्री अवचार, पुष्पा बोदडे, दिपाली बोदडे, अलका खंडारे, शुभांगी भारसाकळे, दिपाली डिगे, दुर्गा वानखडे, मानवी वानखडे, लिलाबाई वानखडे, रंजना इंगळे, बकुळा बोदडे, गोदावरी सपकाळ, कल्पना भोजने, सुशीला तायडे, अर्चना पोहेकर व मिलिंद मंडळाचे कार्यकर्ते संजय तायडे, प्रकाश हिवराळे, रामेश्वर पोहेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते तथा श्रद्धावान उपासक उपासिका बालक बालिका यांची आवर्जून उपस्थिती होती.



















