स्व.पत्रकार शेख अनिस भाई यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. ५.०९.२०२६
संग्रामपूर -स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून वरवट बकाल येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या पटांगणात विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबर रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
स्व. पत्रकार शेख अनिस भाई यांच्या स्मृती जपण्यासोबतच पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या पटांगणात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संग्रामपूर तालुका अध्यक्ष मीर मकसूद अली, ज्येष्ठ पत्रकार गोपाल इंगळे, सत्यशोधक न्यूजचे संपादक शेख कदिर भाई, पत्रकार साबिर खान , पत्रकार अमोल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी राज्य वाहतूक सेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद अस्वार, माजी सरपंच संतोष टाकळकार, संतोष भाऊ ढगे, जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शिक्षक शारीक सर, मुख्याध्यापक राजीक सर, स्वर्गीय पत्रकार शेख अनिस भाई यांचे लहान बंधू शेख कारिस शेख मोहम्मद, शिक्षण समिती अध्यक्ष शेख नाजिम, पुतणे शेख रेहान शेख कारिस, शेख आरीफ, शेख फरिद, लहान पुतणे शेख अयान शेख कारिस, शेख नाझीम शेख कादर, सुभाष जाणू इंगळे यांच्यासह पत्रकार बांधव, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















