प्रभाग क्रमांक ८ मध्ये नगरसेविका जया बघ्घन यांच्या पुढाकाराने फवारणी
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.११.०९.२०२६
तेल्हारा – नगर परिषद तेल्हारा अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच डास व कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेविका सौ. जया विजय बघ्घन यांच्या पुढाकाराने फवारणी करण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांना डास व विविध कीटकांचा त्रास होऊ नये, तसेच परिसरात स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने प्रभागातील विविध भागांत फवारणीचे काम करण्यात आले.
नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी नगरसेविका जया बघ्घन सातत्याने प्रयत्नशील असून, नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या प्रश्नांना त्या प्राधान्य देत असल्याचे यावेळी दिसून आले.
फवारणीच्या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रभाग क्रमांक ८ च्या विकासासोबतच नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण यांना प्राधान्य देणार, अशी भूमिका नगरसेविका सौ. जया विजय बघ्घन यांनी व्यक्त केली.



















