सातारा (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२२.०९.१९
विकासासाठी झाडाच्या मुळावर घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी वृक्षप्रेमी जनतेची मागणी आहे.
फलटण- शहरातील बाणगंगा नदीपासून फलटण ते पुसेगाव या राज्य महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा भागातील मोठी झाडे जेसीपी च्या साह्याने कत्तल करून विल्हेवाट लावण्याचा प्रकार सध्या चालू आहे.
या प्रकाराने परिसरातील वृक्षप्रेमी मधून नाराजीचा सूर उमटत आहे. शासनाने झाडे लावा झाडे जगवा हे संकल्पना सुरू आहे, तर मग झाडे तोडा रस्ता बनवा ही कल्पना नेमकी कोणाची आहे. शासनाने फेरविचार करून झाडे कशी वाचता येतील याचाही विचार करून रस्ता करावा.वृक्ष लावा मग रस्ता करा,अशी मागणी करत विकासासाठी झाडाच्या मुळावर घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी वृक्षप्रेमी जनतेची मागणी जोर धरू लागली आहे.



















