सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०२.२०२०
फलटण- सहायक सरकारी वकील आकांशा कमलेश्वर रणवरे रा.गजानन चौक, नारळीबाग फलटण यांना १०,हजार रूपयांची लाच स्विकारले प्रकरणी एसीबीने रंगेहात पकडले आहे.सातारा एसीबी च्या विभागाने सदरची कारवाई केलेली आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यासह जिह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहित अशी की तक्रारदार यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्यांचे पती, सासु सासरे यांचे विरुद्ध जाचहाट केल्या प्रकरणी तक्रार दाखल केलेली होती फलटण न्यायालयात इतर प्रलंबित केसेस लवकरात लवकर निकाली काढण्याकरीता सहायक सरकारी वकील आकांशा कमलेश्वर रणवरे यांनी तक्रारदार यांचेकडे १५,हजार रुपयांची लाचेची मागणी केलेबाबतची तक्रार दि.०३ फ्रेबुवारी २०२० रोजी दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार दिनांक ०३ फेब्रूवारी २०२० रोजी केले पडताळणी कारवाईमध्ये आकांक्षा कमलेश्वर रणवरे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांना आयपीसी ४९८ अ प्रमाणे तक्रार दाखल केलेली. व फलटण न्यायालयात इतर प्रलंबित केस तसेच इतर प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याकरीता तडजोडी अंती २०, हजार रुपये रक्कम दोन टप्प्यात लाच मागणी करुन त्या लाच
रक्कमेतील एक टप्पा १०, हजार रुपये सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित केले होते. आकांशा रणवरे यांनी लाच स्विकारल्यानंतर त्यांना फलटण न्यायालयातील त्यांचे कार्यालयात पकडण्यात आले असून एसीबी कडून त्याच्यावरती रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राजेश बनसोडे, श्रीमती सुषमा चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलीस उपअधीक्षक श्री.अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक, श्री.अविनाश जगताप,सहा.फो.आनंदराव सपकाळ, पोलीस हवालदार विजय काटवटे, संजय साळुखे, पो.ना. संजय अडसुळ, प्रशांत ताटे, विनोद राजे, श्रद्धा माने, पो.कॉ. संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, म.पो.कॉ.शितल सपकाळ यांनी केली आहे.