रायगड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनीधी, मिलिंद राऊत
दि. ०२.११.२३
उरण- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी आणि प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड कार्याध्यक्ष श्री. हनुमंत पिंगळे यांच्या प्रयत्नाने उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी श्री. सनी म्हात्रे आणि उरण तालुका युवक उपाध्यक्षपदी श्री. अमित साहू यांची नियुक्ती केली तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. भार्गव पाटील, रायगड जिल्हा सरचिटणीस श्री. किशोर ठाकूर, विधानसभा अध्यक्ष श्री. वैजनाथ ठाकूर, तालुका अध्यक्ष श्री. परीक्षीत ठाकूर , शहराध्यक्ष श्री.तुषार ठाकूर, युवक तालुकाध्यक्ष श्री. समत भोंगले, तालुका उपाध्यक्ष श्री. दिनेश पाटील, श्री. राजू जाधव, श्री. सुरेंद्र शिंदे आणि इतर कार्यकर्ते हजर होते.
त्यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करून, पक्षाची ध्येय-धोरणे समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहचवू अशी ग्वाही देऊन तरुणांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात पुढाकार व सहभाग घ्यावा असे आवाहन केले.



















