बीड(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०१.२०२०
🔹 आष्टी तालुक्यात अनोख्या पद्धतीने मकर संक्रात साजरी
आष्टी- ज्या महापुरुषाने समाजाला न्याय मिळवून दिला तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वाण आष्टी तालुक्यातल्या कडा गावातल्या महिलांनी लुटला मकरसंक्रांतीचा अनोख्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील कडा गावातील महिलांनी एकत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकांमधेएकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून व दीपक प्रज्वलित करून अनोख्या पद्धतीने मकर संक्रात साजरी केली.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील कडा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साजरा केला. दरवर्षी इतरत्र मकरसंक्रांतीचा सण महिला सादर करतात मात्र यंदाच्या मकरसंक्रांतीचा सण अनोख्या पद्धतीने करण्याचा कडा येथील महिलांनी विचार केला आणि एकत्र येत आज कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये एकत्र येऊन विचाराचा वान एकमेकांना देत ज्या महामानवाने समाजासाठी कष्ट घेऊन समाजाला न्याय दिला अशाच प्रकारचा विचार घेऊन महिलांनी एकत्र येत आज अनोख्या पद्धतीने मकर संक्रात साजरी करण्याचा एक आदर्श निर्माण केला आहे याबाबत ही मकरसंक्रात कशा पद्धतीने साजरी करायची व केली पाहिजे याबद्दल जनजागृती या महिलांनी केली. राज्यभरामध्ये इतरत्र महिला मकर संक्रातीचा सण साजरा करतात मात्र कडा येथील महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौक मध्ये एकत्र येऊन अनोख्या पद्धतीने मकर संक्रात साजरी करून एक आदर्श निर्माण केलाय ही बाब नक्कीच इतर महिलांना आदर्श घेण्यासारखे आहे. यावेळी रिना जाधव, संयमी ओव्हाळ, राणी साळवे, अश्विनी जाधव, हौसाबाई जाधव, सुमनबाई दुधावडे, शीतल जाधव, मंगल जाधव, नंदाबाई शिंदे, पल्लवी शिंदे, सविता घोडके, जया घोडके, सोनाली शिंदे, वंदना घोडके, अलकाबाई घोडके, पदम बाई घोडके, अश्विनी घोडके, सुरेखा आखाडे, कमलबाई जाधव, परिगाबाई जाधव, सोनाली राजगुरू, सीमा शिरोळे, सविता जाधव, अंजली निकाळजे, मनीषा घोडके, सुरेखा जाधव, आशा घोडके, सुनिता घोडके, मंगल घोडके, काजल राजगुरू, सखुबाई राजगुरू, व इतर महिलांनी मिळून हा आगळा वेगळा उपक्रम राबवला.