बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क प्रतिनिधी,
दि.२०.०४.२०२३
आष्टी- आनंद चैरिटेबल संस्था संचालित, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संलग्न, श्री.छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे दिनांक २०एप्रिलला कृषी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलद्वारे यारीझ क्रोप सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या नामांकित कंपनी मध्ये अग्रीकल्चर फिल्ड ऑफीसर पदाकरीता मुलाखती घेण्यात आल्या. कंपनीच्या कॅम्पस इंटरविव्ह करिता महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या वीस विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. उमेदवार निवड प्रक्रिया तीन टप्यात करण्यात. प्रथम नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यानंतर नोंदणीकृत उमेदवारांचे ग्रुप डिस्कशन आयोजन करण्यात आले होते. सरतेशेवटी सर्व उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्व परीक्षाच्या सरासरी मुल्याकन करून महाविद्यालयातील चार विध्यार्थांची निवड करण्यात आली. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे काकडे सुनील, खराडे अनिल, घवाळे ऋषिकेश व तांदळे ओमकार. निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्याचे आनंद चैरिटेबल संस्था आष्टीचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे सचिव डॉ. अजय धोंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम अरसूल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
या उपक्रमसाठी विध्यार्थी प्लेसमेंट प्रमुख इं. प्रविण जाधव, उपप्रमुख श्री. महेश साबळे, प्रा. कु. सुजाता बनकर, प्रा. लक्ष्मन मिसळ, प्रा. इर्शाद तांबोळी, प्रा. पोपट काळे, डॉ. महेश अजबे व श्री. क्षेत्रे डी. पी. यांनी परिश्रम घेतले. या कॅम्पूस इंटरव्यू साठी यारीझ क्रोप सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे मध्ये काम करणारे श्री. किरण गुंड व श्री. वैभव खोपडे यांचा समावेश होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केल्याबद्दल प्राचार्य यांनी निवड समितीतील सर्व सदस्यांचे आभार मानले.