पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचा ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ ६ जुलै रोजी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, विशाल शिंदे
दि.०२.०७.२०२६
संभाजीनगर – राज्यातील पेपरफुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावरही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक विद्यार्थी व युवकांनी सहभागाची तयारी दर्शविली आहे.
दरम्यान, या आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक तसेच शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले असून, शासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.



















