विना-HSRP वाहनांवर आजपासून थेट कारवाई सुरू; आरटीओ सेवांना लागणार ब्रेक!
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्निल इंगळे
दि.०२.७.२०२६
पुणे – तुमच्याकडे १ एप्रिल २०१९ पूर्वीची जुनी गाडी असेल आणि तुम्ही अजूनही हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवली नसेल, तर आता सावधान होण्याची वेळ आली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत परिपत्रकानुसार दिलेल्या मुदतीनंतर, कालपासून (१ जुलै २०२६) संपूर्ण महाराष्ट्रात कडक अंमलबजावणी आणि थेट कारवाईची मोहीम सुरू झाली आहे.काय होणार कारवाई?दंडात्मक कारवाई: मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ नुसार विना-HSRP वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.आरटीओ सेवा बंद: अशा वाहनांची ट्रान्सफर (मालकी बदलणे), पत्ता बदलणे, बँक कर्ज बोजा चढवणे किंवा उतरवणे (Hypothecation) आणि री-रजिस्ट्रेशन यासारखी सर्व आरटीओची कामे पूर्णपणे थांबवली जातील.कोणाला मिळणार दिलासा?पावती असल्यास सूट: ज्या वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी किंवा त्यापूर्वीच अधिकृत HSRP प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी (Appointment) केली आहे आणि त्यांच्याकडे त्याची वैध पावती उपलब्ध आहे, त्यांना नंबर प्लेट मिळेपर्यंत या कारवाईतून तात्पुरता दिलासा मिळेल.या कडक नियमांमुळे वाहनधारकांना आपल्या जुन्या वाहनांना त्वरित अधिकृत HSRP प्लेट बसवून घेणे बंधनकारक झाले आहे, अन्यथा दंडासोबतच दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.



















