उपवर्गीकरणाच्या विरोधात महा मोर्चाची हाक; २० टक्के आरक्षणाच्या मागणीवर भर
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, मनोज पोहरकर
दि.३०.०१.२०२६
पुणे- अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात तसेच जनगणनेनंतर २० टक्के आरक्षणाची मागणी करत राज्यभर महा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू करू नये. जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात विविध सामाजिक संघटनांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चादरम्यान शासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असून, मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या विषयावर राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, शासनाकडूनही याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे.



















