नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.०५.२०२०
येवला : शहरातील सप्तशृंगी मंदीरासमोरील संकुलात असलेल्या दाताच्या दवाखान्यामध्ये ग्रामीण भागातील एक तरूण विवाहीत महिला गुरुवार (दि.२१) रात्री ८ .३० च्या सुमारास तीच्या सासऱ्या बरोबर दाढ दुखत असल्याने आली होती, दाढेची तपासणी करताना या डॉक्टरने संबंधीत महिलेच्या सासऱ्याला कोरोना साथ चालू असल्याचे सांगत बाहेर जाण्यास सांगीतले. त्यानंतर या नंतर नराधम डॉक्टरने महिलेच्या शरीराला लगट करीत नको तिथे स्पर्श करीत तीच्या कडे लैगीक सुखाची मागणी करीत विनयभंग केला. हा प्रकार घडताच ही महिला तातडीने बाहेर निघाली. यावर डॉक्टरने महिलेला सदर प्रकार कुणाला सांगीतल्यास तुझीच बदनामी करेन असा दम दिला. शुक्रवारी सकाळी सदर पिडीत महिलेने सदर प्रकार घरी सांगीतला. आणि घरच्या बरोबर जात येवला शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या महिलेच्या फिर्यादीवरून संबधित डॉक्टरवर भादंवि ३५४ अ व ५०६ अन्वये विनयभंग व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर संशयीत आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.



















