सांगली(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०६.२०२०
सांगली – केरळ मध्ये हत्तीनीने जल समाधी झालेली घटना ताजी असतांना देखील प्राण्यावर होणारे अत्याचार कमी होताना दिसत नाही. अशीच एक घटना दिनांक २० जून रोजी अमरावती जिल्यातील मोर्शी येथे घडली.या बाबत अधिक माहिती अशी की, संशयीत रिजवान गफ्फार यांनी चेतन लोणकर यांच्या पाळीव कुत्र्याला लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. याचा जाब विचारला असता गफ्फार यांनी लोणकर यांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. या बाबत चेतन लोणकर यांनी मोर्शी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करायला गेले असता. पोलिसांनी प्राण्या विषयी असणारे गुन्हा न नोंदवता फक्त एन.सी.आर. दाखल करुन घेतला. त्यानंतर लोणकर यांनी मोर्शीतील प्राणीमित्र अभिलाष व्यवहारे, वाईल्ड ऍनिमल रेस्क्यू अँड स्टडी असोसिएशन मोर्शी (वारसा संस्था मोर्शी ) यांना संपर्क करुन सदर घटनेची माहिती दिली. अभिलाष व्यवहारे यांनी सदरची घटना सांगलीतील पिपल फॉर अनिमल्सचे कायदेशीर सल्लागार अँड.बसवराज होसगौडर यांना सांगितला. या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन अँड. बसवराज होसगौडर यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महा संचालक व अमरावती जिल्ह्याचे आयुक्त यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार केली. त्यानंतर मोर्शी पोलीस स्टेशन येथील संबंधित अधिकारी यांना संपर्क करुन प्राण्या संदर्भात असणारे कायदे, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०, कलम ११ (१)(अ) व भारतीय दंड संहिता १८६०, कलम ४२८, ४२९, ५०४, ५०६ अन्व्ये गुन्हा नोंद करण्यास विनंती केली. त्या प्रमाणे गफ्फार यांच्या विरुद्ध मोर्शी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्री नरेंद्र खासारे करत आहेत.



















