सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०७.२०२०
शिरवळ- सातारा जिल्ह्यातला धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हा आठवडा तर प्रचंड वेगाने कोरोना बाधित असल्याचा आकडा मोठा असल्याचे दाखवत असल्याने जिल्हा हादरला आहे. या अनुषघाणे शिरवळ येथील स्टार सिटी येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोसायटीमधील सदस्यांची सोशयल डिस्टन्सचे सर्व नियम पाळत दि. ०३ जुलै रोजी स्टार सिटी येथे बैठक पार पडली. कोरोनाच्या प्राश्वभूमीवर खबरदारी म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काही महत्वपूर्ण उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे स्टार सिटी सोसायटी मध्ये एकही कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळून आला नाही. ही कौतुकास्पद बाब आहे. कोविड१९ रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सोसायटीने
रात्री ९ ते पहाटे ५ या कर्फ्यु वेळेत सोसायटीचे गेट बंद करून फक्त अत्यावश्यक कामासाठीच आत सोडण्यात यावे, कंपनीमध्ये कामाला जाणाऱ्या लोकांना कंपनी ओळखपत्र दाखवुनच सोडण्यात यावे, ज्या व्यक्तीला रात्री ९ नंतर सोसायटीच्या व्यक्तीशी भटायचे असेल तर गेटवर येऊन भेटावे, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान मोजणे बंधनकारक केले आहे. मास्क शिवाय सोसायटीच्या आवारात प्रवेश बंदी असेल, जर मास्क नसेल तर ५०० रु. दंड आकारण्यात येईल. सोसायटी मधिल सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेतच चालू राहतील, नियमांचे उल्लंघन केल्यास सोसायटी १००० रू. दंड आकारण्यात येईल तसेच पुढील ६ दिवस दुकान बंद राहील. सोसायटी गेटवर सिक्युरिटी ना दमदाटी अथवा हूज्जत घातल्यास संबंधित व्यकीतीची पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात येईल. सुरक्षा कारणास्तव सोसायटी मधील लिफ्ट बंद करण्यात येईल.अशा प्रकारे सोसायटी मधे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचे विविध स्तरातून कौतुक होत असून सोसायटीतील राहवाशी ही या निर्णयाचे काटेकोर पणे पालन करीत आहेत.



















