सांगली(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०७.२०२०
कुपवाड- युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे राहणार वाघमोडे नगर, कुपवाड यांचा पाठलाग करून धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून केल्याचा प्रकार आज दुपारी घडला. मिरज औद्योगिक वसाहतीमधील होटेल अशोका समोरील रोहिणी ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेजमध्ये पाटोळे यांचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला. पाटोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. महापालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढे आले होते औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवण्याचे त्यांच्याकडे कंत्राट होते. आज दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरून मिरज औद्योगिक वसाहतीकडे निघाले असता. त्याच वेळी होटेल अशोका समोर त्याच्यावर दुचाकी वरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. दुचाकी वरून ते खाली पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पळू लागले. हॉटेल समोर असलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये धाव घेतली असता. कोल्ड स्टोरेज मधील कामगार त्यांना वाचवण्यासाठी धाडसाने पुढे आला असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्याच्या हातावर वार झाल्यामुळे तो जखमी झाला तो पर्यंत अतिशय निर्घुणपणे वार झाल्यामुळे काही क्षणातच पाटोळे मृत झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले खुनाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल, कुपवाड चे सहायक निरीक्षक नीरज उबाळे व पथक घटनास्थळी होते. परिसरात नागरिकांची गर्दी जमलेली गर्दी हटवून पंचनामा करण्यास सुरुवात केली. खुनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या पदाधिकारीचा खून झालेला समजताच. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक गिल यांनी पोलिसांना तातडीने तपासाबाबत सूचना दिल्या तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास देखील सांगितले आहेत. प्राथमिक तपासात आर्थिक वादातून खून झाला असावा अशी शक्यता आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहे.



















