सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.१०.२०२०
सांगली- पंढरपूर येथील करकंब वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सुगाव गावातील हरी ज्ञानु पवार यांनी बेकायदेशीरपणे वन्य तितर पक्ष्यांचे शिकार केल्याप्रकरणी पंढरपूर वनपरिक्षेत्र विभाग यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहीती आशी की संशयीत आरोपी शेतीचे परिसरात बेकायदेशीरपणे जाळी लावून वन्य तितर पक्षी पकडून विकत असल्याचे माहिती सांगलीतील पिपल फॉर अनिमल्सचे कायदेशीर सल्लागार,पक्षीमित्र व निर्भीड पत्रकार विशेष प्रतिनिधी अॅड बसवराज होसगौडर यांना समजलं. त्वरित आपल्या सूत्रांच्या मदतीने संशयीत आरोपीचे माहिती काढुन वन विभागास तक्रार दिली. तक्रार प्राप्त होतास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री व्ही.एन.पवळे यांच्या मार्गदर्शनखाली परिवीक्षादिन वनअधिकारी श्री व्ही. बी.लोंढे, वनपरीमंडळ अधिकारी श्रीमती एस.एस.पत्की, वनरक्षक श्री टी.एस. दिघे, वनरक्षक श्री एस.व्ही.पाटील, वन मजुर श्री बी. एस. पिसे, श्री डि, यू, मुलाणी, श्री आर.पी.फरकुंडे पथकाने संशयीत आरोपी यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता तितर पक्षी, पक्षी पकडण्याचे जाळी आढळून आले. आरोपीला ताब्यात घेऊन वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ अन्व्ये कलम २, ९ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. वन्यजीवांची हत्या, शिकार, तस्करी करणे गुन्हा असून आरोप सिद्ध झाल्यास आरोपीस ३ ते ७ वर्ष कैद किंवा १० हजार रुपये ते २५ हजार रुपये पर्यंत दंड होऊ शकतो. असे गैरकृत्य आढळून आल्यास वनविभागास कळवावे असे आवाहन पंढरपूर वनविभागाकडून करण्यात आले आहे.



















