नाशिक(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०८.२०२१
नाशिक- गमालेगाव येथील शिवस्वरूप ग्रुपच्या वतीने चिपळूण व कोकण मधील काही भागात मदतीचा हात देण्यात आला आहे. विविध संसार पयोगी व किराणा साहित्याचे वस्तू रवाना करण्यात आल्या आहेत या प्रसंगी ग्रुपचे आधारस्तंभ गणेश चव्हाण पवन कचवे, शुभम पाटील, मार्गदर्शक अविनाश चव्हाण, सचिन इंगळे,गणेश पाटील, दुर्गेश देशमुख,जय गुप्ता, किशोर डागा, सचिन माळी, निलेश पाटील, गिरीष जाधव, समाधान गुजर, हर्षल चौधरी, मयूर मोरे, प्रसाद पगारे, चेतन बोरसे, यांच्यासह शिवस्वरूप ग्रुप खडकी, धर्मवीर ग्रुप द्याने, शिवस्वरूप ग्रुप बेळगाव पाडे छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकतें उपस्थित होते. मालेगाव तालुक्यातून या विविध ग्रुपच्या माध्यमातून कोकण भागात आलेल्या संकटांना समोर जाण्यासाठी मदतीचा एक हात देण्याचे काम शिव स्वरूप ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या कामाची दखल घेत निर्भीड पत्रकार मालेगाव तालुका प्रतिनिधी योगेश आहिरे यांनी सर्व ग्रुपचे फोन करून आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.



















